Saturday, July 27, 2019

सहारा..

रूखसत के फसानों को निगाहोंसे बयाॅं कर के 
दिल में छुपे तुफाॅं को दिल में थमा कर के
रिश्तों की नीव को मजबुती अदा कर के
बढते रहो जिंदगी के सफर के हर मंजर को कैद कर के

राही बदल जाएंगेरास्ते मुड जाएंगे
मंजिल की ओर चलते शायद साथ छुट जाएंगे
मगर जहन में बसे रिश्ते कायम रहेंगे
यादों के भरे आंगन ही जीने का सहारा बनेंगे

Wednesday, June 19, 2019

ती आणि तो

प्रिय तू,
मला आवडतोस तू...
मला पाऊसही आवडतो...
पावसातला तू त्याहून जास्त आवडतोस...
पावसात ती जर असेल तर त्यालाही खूप आवडतं आणि मलाही...
पण तिच्यापेक्षा मला तुझ्याबरोबर पावसात जायला जास्त आवडतं...

कधीकधी तीची company हवीहवीशी वाटते...
पण तू मात्र नेहमीच भेटावस असं वाटतं...
कधीही,कुठेही आणि तू आवडतोस अश्या सगळ्यांबरोबर तुला भेटायला जाम मस्त वाटतं...

कधीतरी तीला आणि तुला एकत्र भेटवेन...
तीचा स्वभाव strong, आणि तुझा मात्र कडक!!

#तीआणितो
#monsoonspecial #teaanicoffee

Monday, May 27, 2019

प्रेम असावं.....

प्रेम असावं शुभ्र आकाशासारखं 
तळपत्या उन्हातही आल्हाददायक वाटावं असं

प्रेम असावं चांदण्यासारखं
काळोखातही आधार वाटावं असं

प्रेम असावं समुद्रासारखं 
खळबळाटातही शांत वाटावं असं

प्रेम असावं पावसाच्या सरींसारखं
बरसून गेल्यावरही हवहवहवसं वाटावं असं

प्रेम असावं गुलाबाच्या फुलासारखं
काट्यांनाही झुगारून बहरून यावं असं

प्रेम असावं तुझ्या-माझ्यासारखं
असूनही नसल्यासारखंनसूनही असल्यासारखं वाटावं असं