Monday, May 27, 2019

प्रेम असावं.....

प्रेम असावं शुभ्र आकाशासारखं 
तळपत्या उन्हातही आल्हाददायक वाटावं असं

प्रेम असावं चांदण्यासारखं
काळोखातही आधार वाटावं असं

प्रेम असावं समुद्रासारखं 
खळबळाटातही शांत वाटावं असं

प्रेम असावं पावसाच्या सरींसारखं
बरसून गेल्यावरही हवहवहवसं वाटावं असं

प्रेम असावं गुलाबाच्या फुलासारखं
काट्यांनाही झुगारून बहरून यावं असं

प्रेम असावं तुझ्या-माझ्यासारखं
असूनही नसल्यासारखंनसूनही असल्यासारखं वाटावं असं