कोसळणारा पाऊस मला खूप आवडतो
आपल्या सरींनी तो नजरेसमोरचं जग धूसर करून टाकतो,
काही काळ सगळं विसरायला लावतो,
थंडगार थेंबांनी मनाला मोहरून टाकतो,
मादक सुगंधाने नवीन चैतन्य घेउन येतो,
चोहीकडे जणूे उत्साह बहरतो!
खूपदा मनात विचार डोकावतो, या पावसासारखं आयुष्य पण धुवून काढावं,
जुनं दुःख विसरावं, नवं सुख घेऊन पुढे जावं,
शुभ्र सरींसारखं फक्त आनंद घेऊन जगावं,
मन धावेल त्या दिशेला त्या च्या सारखचं बरसावं!
पण हळूहळू त्या चं कोसळणं मंदावतं,
धूसर दिसणारं जग स्पष्ट दिसायला लागतं,
त्याचं बरसणं जेव्हा पूर्णपणे थांबतं , तेव्हा सगळं पुन्हा शांत होतं,
आकाश स्वच्छ झाल्यासारखं मनातलं वादळही मग अलगद ओसरतं,
स्वतःशीच हसत, नजर सावरत, पाऊल आपोआप घरी परततं!

बरसणार्या पावसाची आणि अस्वस्थ मनाच्या स्थितीची किती छान सांगड घातली आहेस .सुरेख!
ReplyDeleteApratim!!! Kupach sundar kavita aahe...
ReplyDeleteMalapan paus khup aavadato..